Friday, January 10, 2025

/

लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील डेअरी क्षेत्राला मोठा फटका

 belgaum

लाॅक डाऊनमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठी घट झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम बेळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादन अर्थात डेअरी क्षेत्रावर झाला आहे. याचा मोठा फटका बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला बसला आहे.

बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (बीइएमयुएल) जिल्ह्याभरात मोठे जाळे पसरले आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाकडून 1.85 लाख लिटर दुधाची खरेदी झाली होती. यावर्षी ती 2 लाख लिटरवर पोचली आहे. संघाच्या दुधाचा खप महाराष्ट्रात दररोज 30 हजार लिटर आणि गोव्यात 45 ते 60 हजार लिटर इतका होतो. तथापि लॉक डाऊनमुळे आता महाराष्ट्रात 5 हजार लिटर व गोव्यात 20 हजार लिटर दुधाची विक्री होत आहे.

दुधाची रोजची खरेदी 2 लाख लिटर इतकी आहे. खरेदीच्या मानाने दररोज 1 लाख 30 हजार लिटर दुधाची विक्री होणे गरजेचे आहे. मात्र आता दररोज 60 हजार लिटर इतका दुधाचा खप होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने घातलेल्या मर्यादित संचारबंदीमुळे तसेच शेजारच्या महाराष्ट्र सरकारने घातलेल्या संपूर्ण संचार बंदीमुळे बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात मोठा ग्राहकवर्ग असला तरी तेथील संचारबंदी कर्नाटक पेक्षा अधिक कडक असल्याने व कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यास वाहनांना बंदी असल्याने दूध विक्रीत मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील वसतीगृह, निवासी शाळा, हॉटेल्स, धाबे, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, चहाच्या टपऱ्या, शैक्षणिक संस्था, शासकीय व खाजगी कार्यालये लाॅक डाऊनमुळे बंद ठेवण्यात आल्याने दूध, दही, ताक तसेच लोण्याची मागणी बंद झाली आहे. विक्री अभावी शिल्लक राहिलेले दूध सध्या धारवाड, जमखंडी व यलहंका (बेंगलोर) येथील मदर डेअरीमध्ये दूध पावडर आणि लोणी तयार करण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.