बेळगुंदी (ता.बेळगाव) येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून नजीकच्या चंदगड तालुक्यातील 11 गावे सील करण्यात आली आहेत. या गावांचा आढावा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकताच घेतला.
बेळगांव तालुक्यातील बेळगुंदी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर नजीकच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, मळवी, मळवीवाडी, सुरुते, तुडये, कोलिक म्हाळुंगे, सरोळी व हाजगोळी ही 11 गावे खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकतीच तुडये येथे भेट देऊन सील करण्यात आलेल्या सर्व अकरा गावातील पोलिस बंदोबस्ताची माहिती घेतली. यावेळी त्यांनी चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सरपंच शिवाजी कांबळे आरोग्य उपकेंद्राचे डॉ.. आर. आय. नायकवडी पोलीस पाटील जयवंत पाटील आणि ग्राम विकास अधिकारी जनार्दन पानंद हे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एस.पी. डॉ. अभिनव देशमुख यांनी चंदगड पोलिसांना संचारबंदी बाबतही मार्गदर्शन केले. दरम्यान, उपरोक्त अकरा गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून गावातील लोकांना बाहेर आणि बाहेरील लोकांना गावात जाण्यास प्रवेश बंदी असून सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.