“त्या” 11 जणांसह खानापूरातील सर्व 27 जण निगेटिव्ह

0
2530
Khanapur logo
 belgaum

नवी दिल्ली येथील मरकज निजामुद्दीन येथून आलेल्या 11 जणांसह खानापूर तालुक्यातील एकुण 27 जणांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे खानापूरच्या आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यांनी ट्विटद्वारे कळविले आहे.

नवी दिल्ली येथील मरकज निजामुद्दीन येथून आलेल्या खानापूर तालुक्यातील तबलीग जमातीच्या 11 जणांसह एकूण 27 जणांच्या स्वॅबचे नमुने कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

या सर्वांचा अहवाल प्रयोगशाळेतून आला असून संबंधित सर्व 27 जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी खानापूरवासिया एकजुटीने कोरोना विरुद्ध यशस्वी लढा देतील, असा विश्वास आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ट्विटवर व्यक्त केला आहे.

 belgaum

असे आहे अंजलीताई यांचे ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.