बेळगावात तीन कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे लॉक डाऊनची अमलबजावणी काटेकोरपणे करा.जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करा अश्या सूचना जगदीश शेट्टर यांनी बेळगावातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सरकारी विश्रामगृहात बोलविण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घ्या.महसूल, आरोग्य आणि पोलीस खात्याने समन्वय साधून कार्य करावे. भाजी ,धान्य आणि औषध पुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी घ्या अश्याही सुचना पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केल्या.
दिल्लीला जावून आलेल्या 96 पैकी 80 जणांची माहिती मिळाली असून अन्य तेरा व्यक्ती अन्य राज्यात गेल्या आहेत.त्यांची माहिती संबंधित राज्यांना दिली आहे.80 पैकी 33 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत.
रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी दवाखान्यांना आवश्यक ती मदत करा अशी सूचना शेट्टर यांनी केली.बैठकीला मंत्री सुरेश अंगडी यांच्यासह लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी उपस्थित होते.
बेळगावातून एकूण 60 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यातील 51 निगेटिव्ह 3 पोजिटिव्ह तर 6 अहवाल येणे बाकी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.