गोव्याहून बेळगावला बेकायदेशीररित्या बनावट दारू घेऊन येणाऱ्या दोघांना सोमवारी उद्यमबाग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे मद्याची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे तळीरामांचा घसा कोरडा असलेला ओला करण्यासाठी सोमवारी दोघे जण गोव्याहून बेळगावला तब्बल 3 लाख 70 हजार रुपये किमतीची दारू आणत होते. याची माहिती उद्यमबाग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करून दारू व गूडस टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लॉक डाऊन काळात बेळगाव येथे सर्वात मोठी कारवाई असल्याचेही उघडकीस आले आहे.
मंजुनाथ सुरेश पाटील (राहणार फोर्ट रोड) सुभाष सुधीरडे (राहणार महादेव रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी गोव्यावरून केए 22 जी 3382 वाहन जप्त करण्यात आले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन व बेकायदेशीरित्या करण्यात येणारी दारू व वाहन ताब्यात घेतले आहे.सदर गुडस टेम्पो गोव्याला भाजी घेऊन जात होता परतते वेळी दारु आणत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
या बाबत उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. गोव्याहून बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या घटनेची माहिती आधीच समजली होती. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट समोर नाकाबंदी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनाची चौकशी केली असता वाहनांमध्ये 3 लाख 70 हजार रुपयांची बेकायदेशीर दारू आढळून आलेले आहे. त्यामुळे दारू व दोघांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही लॉक डाऊन काळात जर असे कोणी प्रकार केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.