संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. मात्र काही खाजगी शाळा अनेकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे जर शुल्क वाढवून खाजगी शाळांनी पालकांची लूट सुरू केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी ही आपल्याकडे आल्या आहेत असू त्यांच्यावर कारवाई करु, असा इशारा सार्वजनिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी दिला आहे.
नुकतीच यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खाजगी शाळांना कोणतेही शुल्क वाढवू नये असे सांगितले आहे. पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2020- 21 या वर्षात खाजगी शाळांनी शुल्कवाढ न आकारता पालकांना दिलासा द्यावा. तसे न करून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत कोणत्याही खासगी शाळांनी ही शुल्क वाढ करू नये. याचबरोबर ज्या शाळांना शुल्क घ्यायची आहे ती ऑनलाइन भरून घ्यावी आणि त्याचा उपयोग शिक्षकांच्या पगारासाठी करावा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
कोणत्याही शाळांनी जर पालकावर शुल्क वाढीसाठी दबाव घातला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपल्याकडे काही पालकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे यापुढे जर याच्या तक्रारी आल्या तर संबंधित शाळा बंद करण्याचा आदेशही देणार असल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे शाळा आणि शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. ज्या शाळांनी विविध प्रकारचा शुल्क भरण्यासाठी पालकांना तगादा लावला आहे, असे करू नये. अन्यथा संबंधित शाळांबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल असा इशाराही शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी दिला आहे.