मागील काही दिवसापासून लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे माणसांबरोबरच जनावरांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव येथेही श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने काही गायींना गोशाळेत पाठवून देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फुलबाग गल्ली बेळगाव येथे पाच ते सहा गायी ऊपाशी असल्याची माहिती श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित गायींना गोशाळेत हलविण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये दोन-तीन गायींची वासरे ही त्यांनी गो शाळेकडे हलविली आहेत. लॉक डाऊन काळात श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, दिनेश दिवटे, छोटू लंगरकांडे, संजय चौगुले यांच्यासह आधी कार्यकर्त्यांनी संबंधित गायींना पकडून महावीर गोशाळा येथे पाठविले आहे.
मागील काही दिवसापासून या गायींना चारा नसल्याची माहिती येथील कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी त्यांची व्यवस्था करण्यासाठी गोशाळेत रवानगी केली आहे. त्यांच्या या कार्याचे साऱ्याच ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे.