कोरोनाचा वाढता धोका आणि त्यावर होत असलेल्या उपाययोजना या सार्या परिस्थितीत बेळगुंदी एका पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात कोणालाही जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे. या गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मात्र एकाही व्यक्तीला त्या रोगाची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बेळगुंदी गावात 735 कुटुंबीयांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकाही व्यक्तीला ताप खोकला किंवा सर्दी असा आजार आढळला नाही. त्यामुळे आरोग्य खात्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र येथे येण्या-जाण्यास अजूनही बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने घेतलेल्या दक्षतेमुळे आणखी कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान तहसीलदार कुलकर्णी आणि तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी नुकतीच बेळगुंदी गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत. या परिसरात कोणत्याही रोगाचा फैलाव होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहेत. बेळगुंदी येथे आढळून आलेल्या पॉझिटिव रुग्णामुळे मोठी खळबळ माजली आहे. याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे.
बेळगुंदी गावात मागील तीन दिवसांपासून आरोग्य खात्याने 735 कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली आहे. यामध्ये कोणताही रुग्ण संबंधित कोरोणाचा नसल्याचे उघड झाले असले तरी अजूनही तेथील आरोग्य तपासणी सुरूच आहे. या सार्या पार्श्वभूमीवर अनेकांनी धास्ती घेतली असली तरी बेळगुंदी गावात सध्या तरी एकही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी भीती नको असे आवाहनही अधिकाऱ्याने यावेळी केले आहे.