कोरोना विषाणूचा पहिला आणि लाॅक डाऊन यामुळे सर्वच व्यवहार बंद असून यामधून हेअर कटिंग सलूनही सुटलेली नाहीत. तथापि ग्रामीण भागात यावर पर्याय शोधून काढण्यात आला असून शेतवडीत अथवा घराबाहेर मोकळ्या जागेत कटिंग केले जात आहे.
कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक मुद्दे चर्चेत आले. त्यामध्ये हेअर कटिंग सलून चालक अर्थात नाभीकांचा मुद्दादेखील होता. सध्या सर्व सलून दुकाने बंद असल्यामुळे दुकानातच जाऊन वेळच्या वेळी कटिंग आणि दाढी करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. आज-काल दाढी राखण्याची फॅशन आल्यामुळे दाढी वाढवली तरी त्याचे फारसे कांही वाटत नाही. अनेक जण घरीदारी करत असल्यामुळे त्यांची ही फारशी गैरसोय होत नाही. परंतु डोक्यावर वाढलेल्या केसांचे काय? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
शहरात सध्या केस कटिंग व्यवसायावर ज्यांचे पोट अवलंबून आहे ते हेअर कटिंग दुकान बंद आहेत त्यामुळे शहरातील लोकांना स्वतःची दाढी स्वतःच करून घ्यावी लागत आहे.
ग्रामीण भागात यावर पर्याय शोधून काढण्यात आला असून शेतवडीत अथवा घराबाहेर मोकळ्या जागेत कटिंग केले जात आहे. राकस्कोप सारख्या ग्रामीण भागात एका कुटुंबात 50 सदस्य असलेल्या मोरे कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे दाढी कटिंग स्वतःच ग्रुप दाढी कटिंग करून टाकली आहे.
त्याचप्रमाणे लॉक डाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन पुन्हा केस कटिंगची कटकट नको म्हणून अनेकांनी आपल्या डोक्याचे संपूर्ण केस कापून टाकणे पसंत केले आहे. परिणामी गावात डोक्याचा चमनगोटा केलेली ही मंडळी सार्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.