शेतात असलेल्या पाण्याच्या खड्डड्यात पडलेला मोबाईल काढायला जाऊन चार चिमुरडी बालक बुडून मयत झाली आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अंजनकट्टी गावात शेतातील खड्याततील पाण्यात बुडून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाल्याची दूर्देवी घटना शनिवारी घडली आहे.
भागवा (वय 6), सुप्रिता (वय 5), मल्लप्पा (वय 4) आणि राधिका (वय 3) ही मृत बालकांची नांवे आहेत. अंजनकट्टी गावचे करेप्पा जक्कांनावर महादेवी जक्कांनावर या दांपत्याची ही मुलं आहेत.
गावातील घरात राहिल्यास कोरिनाची बाधा होईल म्हणून हे कुटुंबीय शेतातील घरात शिफ्ट झाले होते शेतात पाणी साठवण्यासाठी त्यांनी खड्डा काढला होता.मोबाईलवर खेळता खेळता ही चारी मुलं त्या खड्ड्याकडे गेली होती त्यावेळी खड्ड्यात मोबाईल पडला तो मोबाईल काढायला जाऊन चारी मुलांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण देशात लॉक डाउन झाला असताना पालक आपल्या मुलांना घेऊन त्यांच्या उपजीवनासाठी शेतात गेले होते.
गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.