सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखालील “फुड फॉर नीड” या संघटनेने आपल्या मदत कार्याची व्याप्ती आता चक्क गोव्याच्या सीमेपर्यंत वाढविली आहे. या संघटनेतर्फे बुधवारपासून चोर्ला मार्गावरील चेक पोस्टवर तैनात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर गोव्याला बेळगावची जोडणार्या चोर्ला मार्गावर वाहन आणि वैद्यकीय तपासणीसाठी चेक पोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. याठिकाणी पोलीस, अबकारी आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वांना गेल्या बऱ्याच दिवसापासून सरकारकडून भोजन पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. ही बाब निदर्शनास येतात बेळगावच्या फुड फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे त्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून गेले आहेत.
फुड फॉर नीडीतर्फे बुधवारी बेळगाव चोर्ला मार्गावरील चेक पोस्टवर तैनात असणाऱ्या सर्व व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुपारचे आणि रात्रीचे भोजन वितरित करण्यात आले. याप्रसंगी सुरेंद्र अनगोळकर यांच्यासह योगेश कलघटगी, जयश्री पाटील, गीता कोळी -पाटील आदी उपस्थित होते. या पद्धतीने “फुड फाॅर नीडी” संघटनेतर्फे यापुढे दररोज तब्बल सुमारे 256 कि. मी. अंतराचा प्रवास करून चोर्ला मार्गावरील उपरोक्त सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम राबविणार आहे हे विशेष होय.