कंग्राळी बुद्रुक तालुका बेळगाव येथे एका शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेतात पाणी सोडण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.
मारुती रामचंद्र पवार वय 45 राहणार कलमेश्वर गल्ली कंग्राळी बुद्रुक असे शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मारुती यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मारुती यांचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवागरात हलविण्यात आला असून उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मारुती सकाळच्या सुमारास शेतात पाणी सोडण्यासाठी गेले होते. पाणी सोडून ते दुपारपर्यंत शेतातच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांना शॉक लागला आणि ते जागीच कोसळले. ही घटना उशिरा लक्षात आली. तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
वीज महामंडळ च्या हलगर्जीपणामुळे मारुती यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिस स्थानकात या घटनेची माहिती देण्यात आली आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.