बेळगाव शहरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची बातमी इकडेतिकडे पसरत आहे, लोक एकमेकांकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आहेत ,हे रुग्ण कुठल्या भागातले आहेत त्या संदर्भातील चर्चा सुरू आहे. काही टीव्ही माध्यमानी तिघेजण पॉझिटिव असल्याची बातमी दिल्यानंतर बेळगाव live ने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिकृत माहिती देतील अशी माहिती मिळाली आहे .
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत पॅनिक होऊ नका. असे आवाहन करण्यात येत आहे.
बेळगाव मध्ये कोरोनाचे तीनहुन अधिक रुग्ण आढळले .अशी चर्चा शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली आहे. याबद्दल प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती उघड केली नाही किंवा खात्रीशीर वृत्त दिले नाही, काळजी आणि खबरदारी म्हणून पोलीस पुन्हा एकदा लॉक डाऊनची काटेकोर आणि कठोरतेने अंमलबजावणी करत आहेत.
बेळगाव मध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत अशा चर्चेला ऊत आला आहे. सोशल मीडिया वरून सुद्धा याबाबत व्हायरल मेसेज फिरत आहेत .
जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकारी त्याबद्दल नेमके वृत्त देत नाहीत तोवर पॅनिक न होणे ही गरज आहे. शुक्रवारी सकाळपासून पोलीस पुन्हा एकदा येणाऱ्या जाणाऱ्यांना आडवून माघारी पाठवत आहेत .
सायंकाळी 4 वाजता दिल्ली रिटर्न असलेल्या 33 जणांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल येणार आहे त्यानंतर आरोग्यमंत्री बी श्री रामलू बंगळुरूत तर बेळगावात डी सी बोमनहळ ळी याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत.