कोरोनामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात असलेला भाजीपाला बाजारात नेणे देखील मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत या भाजीपाल्याचे करावे काय? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी असताना अनेकांनी ट्रॅक्टर फिरवले आहेत तर काहींनी आता जनावरे सोडण्यास सुरुवात केली आहेत. नुकतीच कडोली परिसरात एका कोबी पिकात बकरी सोडण्यात आली आहेत.
कुमार परशराम जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याने कोबी पीक लावले होते. मात्र ते कोरोनामुळे सर्वच लॉक डाऊन असल्याने भाजी मार्केटला नेऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे या कोबीला सध्या दर नसल्याने ते फेकून देण्यात येत आहेत. त्यामुळे पाटील यांनी आपल्या पिकात बकरी सोडली आहेत.
अशी अवस्था तालुक्यात आहे. तालुक्यातील इतर पिकातही अनेकांनी जनावरे सोडून आता रब्बी पिकासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती अनेकांना मारक ठरले आहे. अनेकांचे पीक बुजून गेले आहे तर काहींची पिके जनावरे व ट्रॅक्टर फिरविण्यात गेली आहेत. त्यामुळे सरकारने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव तालुक्यात अशी अवस्था निर्माण झाली आहे. अनेक पिके कुजून गेली आहेत. दर नसल्याने भाजी मार्केटला नेण्याचे ही त्याची रक्कम येणार नसल्याने ही पिके फेकून देण्यात येत आहेत. सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन परिस्थिती असल्याने अनेकजण घरीच बसणे पसंत केले. त्यामुळे शेतातील भाजीपाला वाया जात आहे. याची नुकसानभरपाई सरकारने द्यावी अशी मागणी होत आहे.