कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत राज्यात तिसर्या क्रमांकावर असणारा बेळगाव जिल्हा कोरोना तपासणीमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील कोरोना बाधीत 20 जिल्ह्यांपैकी म्हैसूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना तपासण्या झाल्या आहेत.
म्हैसूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रति दशलक्ष 902 कोरोना तपासण्या झाल्या असून त्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यातील कोरोना तपासण्यांची संख्या प्रति दशलक्ष 162 इतकी कमी आहे.
बेळगाव शहरातील आयसीएमआर – एनआयटीएमच्या इमारतीमध्ये गुरुवारी 23 एप्रिल रोजी कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेत प्रतिदिन 90 नमुन्यांच्या चाचण्या या घेतल्या जाऊ शकतात. तथापि काल गुरुवारी या प्रयोगशाळेतून फक्त 67 नमुन्यांचे अहवाल हाती आले असून 271 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित होते.
काल उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी कोरोना तपासणी केंद्राचे उदघाटन केलं होतं.