Sunday, July 7, 2024

/

बेळगावच्या मुस्लिम बांधवांना सल्ला वाचवा मोहल्ला

 belgaum

कोरोना व्हायरस हा जात, पंथ भाषा, वर्ण बघून हल्ला करत नसून लहानांपासून थोरा पर्यंत आणि समाजाच्या प्रत्येक घटकावर तितक्याच तीव्रतेने बाधा आणू शकतो. बेळगावातील मुस्लिम समाजाला आम्ही बेळगाव Live तर्फे आवाहन करतो की मरकज ला जाऊन आलेल्या अनेक मुस्लिम बांधवांना कोरोनाची बाधा झाली आहे.बेळगाव जिल्ह्यात कुठेही कोरोनाची बाधा नव्हती. सुरक्षित बेळगाव म्हणून बेळगावकर आनंदी होता.

मरकजला जाऊन आलेल्या 8 लोकांचा पहिला पोजीटिव्ह रिझल्ट आला, आणि बेळगाव हादरले त्या 8 लोकांच्या संपर्कात आलेल्या इतर दहा लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आणि आकडा 18 वर पोहोचला आहे.मुस्लिम समाज मुख्यतः छोट्या छोट्या मोहल्ल्यातुन वास्तव करून आहे. त्यांचे एकमेकांशी संपर्कात येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.मुख्यतः मुस्लिम मधील तबलीग समाजाच्या संपर्कात येऊन मोहल्ल्याचे मोहल्ले कोरोना बाधित व्हायची शक्यता आहे. त्यामुळे या समाजातील जाणकार मंडळींनी पुढाकार घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Camp area photo seige
Camp area photo. seige containtment zone

मुख्यतः स्वच्छता पाळणे, सोशल डिस्टन्स मेंटेन करणे आणि शासनाच्या सूचनांचा अवलंब करणे या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याच बरोबर कुणीही तबलीग समाजातील व्यक्ती निजांमुद्दीन मरकजला जाऊन आला असेल तर त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. इतकेच काय तर मरकज रिटर्नच्या संपर्कात जर कुणी आला असेल तर त्याचीही माहिती प्रशासनाला कळवणे गरजेचं बनलं आहे. तरच बेळगावातून कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल.

 belgaum

मानवतेवर आलेल्या या संकटाला संघटितपणे तोंड देणं गरजेचं आहे बेळगावातील मुख्यतः गांधीनगर, आझमनगर, खडे बाजार, शहर, कॅम्प, पिरनवाडी वैभवनगर आदी परिसरातील मुस्लिम बांधवांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.पोलिसांना मुस्लिम समाजा कडून 100% सहकार्याची अपेक्षा आहे.प्रशासनावर व पोलीस यंत्रणेवर वाढणारा ताण लक्षात घेऊन आपलं देश प्रेम सिद्ध करण्याची ही संधी मुस्लिम बांधवांनी सोडू नये हीच अपेक्षा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.