बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपचारांची पूर्णपणे बऱ्या झालेल्या हिरेबागेवाडी येथील 2 रुग्णांना आज रविवारी दुपारी बीम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील उपचारांती कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 6 झाली आहे.
कोरोना बाधितांसाठी असलेल्या शहरातील बीम्स हॉस्पिटलमधून आज रविवार 26 एप्रिल रोजी आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डाॅ. विनय दास्तीकोप यांनी दिली. उपचाराअंती कोरोना मुक्त होऊन पूर्णपणे बरे झालेले हे दोन रुग्ण हिरेबागेवाडी येथील नवरा-बायको आहेत.
सदर रुग्णांपैकी पी -182 क्रमांकाचा पुरुष रुग्ण हा 50 वर्षाचा असून पी -192 क्रमांकाची महिला रुग्ण चाळीस वर्षीय आहे. या पद्धतीने रविवारी आणखी दोन रुग्णांना बीम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी पूर्णपणेबरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 6 झाली आहे.
88 कोरोना संशयितांना डिस्चार्ज
बेळगावात कोरोनाने थैमान घातलेले असताना काही दिलासादायक बातम्याही घडताहेत. बेळगावात नुकतीच 88 संशयित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगावात एकूण सहा पॉझिटिव्ह रुग्णांना घरी जाऊ देण्यात आले आहे. या अगोदर चार आणि रविवारी दोघा जणांना घरी सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट टाळता येते यावरून दिसून येत आहे.