सध्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आक्षेपार्ह संदेश,ऑडिओ,व्हीडिओ क्लिप्स सोशल मीडियावर पोस्ट करून जनतेत घबराट निर्माण करून शांततेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करणे हा अपराध आहे.त्यामुळे कोरोना संबंधी चुकीची माहिती,ऑडिओ,व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करून शांततेला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्रक पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
नुकताच जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्ड मधील रुग्णांचा बाहेरील व्यक्तीने जाऊन व्हीडिओ काढला होता तो व्हायरल झाला होता त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत व्हीडिओ काढलेल्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या नंतर पोलीस आयुक्तांनी देखील याची गंभीरपणे दखल घेत सोशल मीडियावर कोरोना बाबत खोटे मेसेज बनवणे तयार करणे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय.