घरा समोर गाडी धुत असलेल्या सी आर पी एफ च्या कोब्रा कामांडोला केवळ मास्क घातला नाही म्हणून अट्टल गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देत अटक करून जेलला पाठवणे हे अत्यंत चुकीचे आहे. नागरी वेश्यातील सी आर पी एफच्या एकसंबा येथील कोब्रा कमांडोला दिलेली वागणूक अत्यंत चुकीची आहे. असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकिहोळी यांनी केले आहे.
एखाद्या गुन्हेगारांशी वर्तवणूक करावी त्या प्रमाणे पोलिसांनी वर्तन केले आहे लाठी घेऊन नागरी वेश्यातील सी आर पी एफ कोब्राव कमांडोला लाठीनी मारहाण करणे निंदनीय आहे. पोलिसांचे हे कृत्य चुकीचे आहे.कोणताही मोठा गुन्हा झालेला नसताना केवळ मास्क घातला नाही म्हणून अशी कारवाई करणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
या घडलेल्या घटनेत पोलिसांची भूमिका चुकीची आहे या प्रकरणात पोलीस दोषी आहेत अटक करण्यात आलेल्या कोब्रा कमांडो सचिन सावंत याला त्वरित सन्मानाने मुक्त करावे अशी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे याचं बरोबर दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची देखील मागणी आहे.
सदर जवानांचे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पर्यंत पोहोचले या कोब्रा कमांडो प्रकरणात रमेश जारकीहोळी यांनी उडी घेतल्याने पुढे काय घडते याकडे लक्ष लागले आहे.
चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे सचिन नावाच्या सी आर पी एफ कोब्रा कमांडो सोबत पोलिसांची हमरातुमरी त्यानंतर जवानावर घालण्यात आलेली केस…हे प्रकरण केंद्रीय आणि कर्नाटकाच्या गृहमंत्र्यां पर्यंत पोहोचले आहे याबाबत बेळगावचे एस पी लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि जवान आणि पोलिसांत झालेली वादवादीची दृश्ये पहा बेळगाव live वर… सविस्तर वृत्त लवकरचं वाचा
चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे सचिन सावंत नावाच्या सी आर पी एफ कोब्रा कमांडो सोबत केवळ मास्क न घातला म्हणून बेड्या…
Posted by Belgaum Live on Monday, April 27, 2020
9611085229
आपल्या देशातील संरक्षण करणारे मिल्ट्रीमॅन यांना किती संरक्षण मिळते त्यांना मागचा पुढचा विचार न करता करतात सेवा बजावतात, त्यांच्यावर पोलिसांनी जे काय केलेले आहे चुकीची आहे म्हणतात. ते त्यांनी संभाळून घेऊन जाणे फार महत्त्वाचे होते, तसं न करता पोलिसांनी दाखवले आपले ____ फक्त तोंडाला मास लावलेले नाही म्हणून, इतर राज्यात पाहिले काही लोकांना व्यायाम करायला लावले. प्रसाद देत मारत राहिले . देशातील पोलिसांनी. खरोखर जो माणूस फिरतो कोण आहे तपशील घ्यावे.
राज्याचे पोलीससाहेब संयम बाळगावे, (जगातील मनुष्य किंवा प्राणी किंवा पशु जगाचे पाहुणे आहेत हे ओळखावे)