मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात घोषित वीजपुरवठा करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असून वारंवार वीज कपातीचा फटका बसू लागला आहे. सध्या लॉक डाऊन सुरू असले तरी विजेची गरज नितांत भासत आहे. सर्वजण घरीच असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
देशात लॉक डाऊन सुरू असल्यामुळे सर्व जण घरीच आहेत. सुरक्षित अंतर ठेवून आपला दिनक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र अशावेळी जर वीज गायब झाल्याने अनेक समस्या होत आहेत. ग्रामीण भागात विशेष करून दिवसातून पाच ते सहा वेळा वीज कपात करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विचार करून सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
कोरोणामुळे सर्व नागरिक घरीच बसून आहेत. त्यामुळे वेळ काढणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेल्या रामायण महाभारतासारख्या धारवाईक पाहण्यात नागरिक गुंग आहेत. ग्रामीण भागात विशेष करून या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अघोषित वीज कपात करण्यात येत असल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
अजूनही दहावीच्या परीक्षा संपलेल्या नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासात गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या अघोषित वीजपुरवठा कपात करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अभ्यासाची विघ्न निर्माण होत असल्याचे अनेकांचे मत आहे. ग्रामीण भागात असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याचा विचार करून यापुढे तरी सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.