मोहल्ल्या मोहल्ल्या तुन कोरोना बाधित आणि कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिक सतर्क होताना दिसत आहेत गल्ली गल्लीतून दगड टायर लाकडे जुने टी व्ही असे समान रचून आपल्या गल्ल्या नागरिक स्वतःच सील करून घेत आहेत त्यामुळे हळूहळू पोलिसांच्या कामावरचा बोजा कमी होताना दिसत आहे.
नागरिकांनी अश्या प्रकारे सतर्क होऊन घराच्या बाहेर पडण्याचे टाळल्यास कोरोंनाचा प्रतिबंध होण्यास मदत होईल.अस्वच्छ भाजी फळे विक्रेत्या पासून फळ भाजी घेण्यापेक्षा घरातील आमटी भात बनवून खाण्यात सुरक्षितता आहे.हा काळ काहीच दिवसांचा आहे.लोकांशी येणारा संपर्क टाळा आपलं गाव आपण सुरक्षित राहूया आणि कोरोनाला बेळगावातून हद्दपार करूया.
शुक्रवारी कॅम्प बेळगुंदी आणि बागेवाडी भागातील तीन रुग्ण पोजिटिव्ह आढळल्या बेळगावकर एकदम खडबडून जागे झाले आहेतत्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे लॉक डॉउनच्या पहिल्या दिवसा पासून जे करणं गरजेचं होतं ते शनिवार पासून होऊ लागलं आहे.
वडगांव कारभार गल्ली भागात,यमनापूर, बी के कंग्राळी नेहरू नगर आंजेनेय नगर आदी भागात रस्त्यावर अडथळे निर्माण करून रस्ते बंद केले आहेत.एकूणच पाहिलं आता शनिवारी पासून बेळगाव शहर एकदम हाय अलर्ट मोड वर आलं आहे.