बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली.निजामुद्दीन तबलक धर्मसभेला जावून आलेल्या व्यक्तीमुळे त्याच्या परिवारातील आई,वडील आणि भावाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची धास्ती वाढली आहे.
बेळगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आता हा आकडा दुहेरी वर जाऊन पोचला आहे. गुरुवारी सकाळी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामुळे बेळगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या रुग्णांबाबत आता योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकस धर्मसभेत भाग घेऊन पुन्हा बेळगावला आलेल्या नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे सध्या शहराचे वातावरण भयभीत झाले असून राज्य सरकारने याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. संध्याकाळी पाचच्या राज्य सरकारच्या बुलेटीन मध्ये बेळगाव तालुक्यातील आणखी दोघांना लागण झाल्याची बाब उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. एकूण बेळगाव तालुक्यात 6 तर रायबागचे 4 असे दहा पोजिटिव्ह बेळगावात आहेत.
तबलीगी जमातातून परतलेल्या एका मुलाच्या 40 वर्षीय आईला कोरोनाची लग्न झाले आहे तर भावाकडून 22 वर्षीय भावाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मोठी धक्कादायक असून आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. सध्या आढळलेल्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.एकूण हिरेबागेवाडीत एका कुटुंबातील दोन भाऊ आई व वडील अश्या कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे.
यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातवर होती. मात्र गुरुवारी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ही संख्या दहा वर पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र त्याचा फैलाव रोखण्यासाठी आता डॉक्टर कसोशीने प्रयत्न करत आहेत. आणखी कोणाला लागण झाली आहे का याची चौकशी सुरू आहे. सध्या दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अनेकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.