बेळगावात आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावातील एका व्यक्तीस कोरोना पोजिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या अगोदर सात जण पोजिटिव्ह असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता बाधीतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल झालेल्या 50 वर्षीय इसमास कोरिनाची बाधा झाली आहे.हा रुग्ण हिरे बागेवाडी गावचा असून या गावातील पोजिटिव्ह रुग्णांची संख्या दोन तर बेळगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या चार झाली आहे.
या अगोदर बेळगावातील तीन आणि कुडची रायबागच्या चौघांना याची बाधा झाली होती.आजच्या एक त्यामुळे आकडा हळूहळू वाढत आहे.बेळगावात 8 तर कर्नाटक राज्यात कोरोना पोजिटिव्हचा आकडा 191 वर पोहोचला आहे.
50 वर्षीय इसमाला मुलाकडून संपर्क होऊन बाधा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अगोदर मुलाला मग आता वडिलांना बाधा झाली आहे.