Wednesday, January 22, 2025

/

शहरातील तब्बल दीड हजार लग्नसोहळे रद्द!

 belgaum

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉक डाऊनचा तडाखा लग्न सोहळ्यांना देखील बसला आहे. लॉक डाऊनमुळे शहरातील सुमारे 1500 लग्नसोहळे रद्द करून पुढे ढकलण्यात आले आहेत.

लॉक डाऊन मुळे शहरातील सुमारे दोनशे मंगल कार्यालयांमधील लग्न सोहळे स्थगित झाल्यामुळे या सोहळ्यावर अवलंबून असणारे आचारी, कामगार, वेटर, मंडप व्यवसायिक, वाजंत्री, पुजारी, पेंटर गायक – वादक आदी सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यंदा मुळातच मुहूर्त कमी आहेत. कॅलेंडरनुसार एप्रिल ते जून या काळात 19 मुहुर्त आहेत. हे वर्ष अधिक मासाचे असल्याने जुलै ते नोव्हेंबर या काळात लग्न समारंभ करता येत नसल्याने मुहूर्त काढण्यात आलेले नाहीत. ही अडचण असल्याने एप्रिल ते जून दरम्यान बार उडवून देण्याची तयारी अनेकांनी केली होती. तसेच त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक ही केली होती.

Marriage
Wedding file photo

मार्च महिन्यापासून तारखा ऍडजेस्ट करून लग्न कार्यालय बुक केली जातात त्यासाठी ऍडव्हान्स रक्कम ही भरली जाते वधू-वरांच्या आर्थिक कुवतीनुसार जेवणाचे मेन्यू ठरवले जातात. मंडप सजावट, संगीत योजना, वाजंत्री या सर्व गोष्टी आर्थिक स्थितीशी निगडित असतात. मात्र आता लॉक डाऊनमुळे ही सर्व तयारी वाया गेली आहे. आता शासनाच्या आदेशानंतरच मंगल कार्यालय खुली होणार असल्यामुळे त्यानंतरच पुन्हा लग्नाचा मुहूर्त पाहिला जाईल. कांही मंडळींनी ठरलेल्या दिवशी अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकून वातावरण निवळल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे स्वागत समारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आतापर्यंत 18 लग्नासाठी बुकिंग झाले होते मात्र लॉक डाऊनमुळे एप्रिलमधील मुहूर्तावर लग्न होतील की नाही हे सांगता येत नसल्यामुळे परिस्थिती निवडल्यानंतर बुकिंग केलेले विचार करून सांगतील. ज्यांना बुकींग रद्द करायचे आहे त्यांना अॅडव्हान्सची रक्कम परत दिली जाईल, असे मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजी हंगिरकर यांनी सांगितले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.