मागील तीन आठवड्यापासून तळीरामांचा प्रतिक्षेचा बांध फुटत आहे. चांगल्या प्रतीची दारू पिणारेही आता देशी व गावठिवरही येऊन पोहोचले आहेत. लॉक डाऊन मुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली असतानाच तळीरामांची मात्र चांगलेच हाल झाले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने तळीरामांचा पदरी मात्र केवळ प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा वाढली असून तळीरांमांचा तोल ढासळत आहे त्यामुळे दारूची दुकानं फोडण्याचे प्रयत्न होत आहेत.
लॉक डाऊन असल्यामुळे सर्व मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत देखील काहिनी ठेवलेल्या दारूला मोठी किंमत आली आहे. अशा परिस्थितीत देखील काहींनी इकडून तिकडे हातपाय मारून दारूची व्यवस्था करून घेतली. मात्र अजूनही काही जण घसा ओला करण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे आता दारू दुकाने कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
![Arrack shop](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/04/IMG20200414122854-1050x525-1.jpg)
गेल्या तीन आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे दारू दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांच्या घशाला कोरड पडली आहे.आता दारू दुकान उघडण्यासाठी मद्यपीना 4 मे ची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मद्यापीची आता दारू दुकानात चोरी करण्यापर्यंत मजल गेली आहे.
दारूसाठी तळमळणारी मद्यपी आता चोरीचा मार्ग पत्करला आहे. काँग्रेस रोडवरील वाईन्स अँड वाईन्स हे दारूचे दुकान चोरट्यानी फोडण्याचा प्रयत्न केला. दारू दुकानाच्या छतावर चढून दारू दुकानात प्रवेश करण्यासाठी त्यांनी दुकानाची कौले काढली. पण कौले काढल्यावर मद्यापीच्या लक्षात आले की कौलाच्या खाली पत्रा आहे. पत्रा काढणे काही दारुड्याना शक्य झाले नाही. त्यामुळे निराश होऊन रिकाम्या हाताने दारुडे निघून गेले. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी दारू दुकान फोडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळीरामांच्या घशाची कोरड ओली करण्यासाठी अनेक जण आता दारू दुकान फोडण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.