बेळगाव शहराबरोबरच तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. या रुग्णांना मुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराबरोबरच तालुक्याची नाका-बंदी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावात रस्ते अडविण्यात आले आहेत. त्यामुळे आता येण्याजाण्याचे मार्ग बंद करून यापुढे कडक लॉक डाऊन पाळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी आणि शिगीहल्ली.के.एस. मरिकट्टी, येळ्ळूर बेळगुंदी यासह तालुक्यातील पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक गावे बंद करण्यात आली आहेत. स्वयंस्फूर्तीने ही गावे बंद करून अनेकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोनाची धास्ती वाढल्याने असे सारे प्रकार सुरू आहेत.
तालुक्यात 160 हून अधिक गावे आहेत. यामध्ये एकूण 59 ग्रामपंचायती आहेत. संबंधित अनेक गावामधील रस्त्यावर चरी मारून आणि इतर झाडे-झुडपे टाकून मार्ग बंद करण्यात आले आहेत. अशीच परिस्थिती संपूर्ण शहरातील सुरू असली तरी तालुक्यातील कोरोनाची धास्ती घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही व्यक्ती यायचे असल्यास मोठी समस्या निर्माण होत आहे.
काही ग्रामपंचायतीमध्ये वार पाळून गाव बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक गावानी असे प्रयत्नही केले आहेत. तर आणखी गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या साऱ्या प्रकारामुळे नेमकी कोरोनाची धास्ती किती आहे हे गांभीर्याने दिसून येत आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.