Monday, December 23, 2024

/

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 14 “हॉटस्पॉट” घोषित

 belgaum

लॉक डाऊन मागे घेतल्यानंतर शहरातील ज्या ठिकाणी समस्या उद्भवू शकते अशा 14 ठिकाणांची यादी बेळगाव महापालिका व पोलीस खात्याने संयुक्तरित्या तयार केली आहे. या ठिकाणांना “हॉट स्पॉट” असे संबोधण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या कोरोनाचे रुग्ण नाहीत किंवा ते निर्बंधित क्षेत्र देखील नसले तरी पुढेमागे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून त्यांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे

पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील जी 14 ठिकाणे निश्चित केली आहेत, त्याठिकाणची औषध दुकाने, धान्याची दुकाने, मॉल्स, सर्वसामान्य दुकाने, दुकानमालकांचे फोन नंबर, घरांची संख्या, लोकसंख्या आदी माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. शिवाय या ठिकाणच्या प्रत्येकी 100 घरांसाठी एक स्वयंसेवक नियुक्त केला जाणार आहे. त्यांची माहितीही घेतली जाणार आहे. माहिती गोळा करण्याचे हे काम महापालिकेच्या महसूल विभागाकडून केले जाणार आहे. शहरातील कॅम्प, अस्मा कॉलनी व अमननगर येथे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी निर्बंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. हे तीन भाग सोडून शहरातील 14 ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे.

शहरातील 14 हॉटस्पॉट ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत. 1)

ASma coloney
ASma coloney

झटपट कॉलनी, 2) आझाद नगर,3) कसाई गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली व टेंगीनकेरा गल्ली,4) शाहूनगर, अझमनगर व संगमेश्वरनगर,5) शिवाजीनगर, वीरभद्रनगर,6) रुक्मिणीनगर,7) गॅंगवाडी, वड्डरवाडी, व रामनगर,8) तांबिटकर गल्ली,9) अनगोळ,10) गवळी गल्ली टिळकवाडी,11) मजगांव शाळा क्र. 19 समोर,12) निजामुद्दीन चौक,13) कोतवाल गल्ली, खंजर गल्ली, बागवान गल्ली, दरबार गल्ली व काकर गल्ली,14) न्यू गांधिनगर, उज्वलनगर, अमननगर मारुतीनगर व तिरंगा कॉलनी.

वरील भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत किंवा तेथे संशयितांचा वावरही नाही. परंतु भविष्यात लाॅक डाऊन मागे घेतलाच तर समस्या उद्भवू शकते. तसे झाल्यास या ठिकाणी निर्बंध लादले जाऊ शकतात. या ठिकाणी काही प्रमाणात जमावबंदी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी “हॉट स्पॉट”ची उपाययोजना तयार करण्यात आली आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून त्यांनी मंजुरी देताच संबंधित ठिकाणची सर्व माहिती संकलित केली जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.