जेव्हापासून निवडणूक झाली आहे तेव्हापासून कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री कोण आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे. सध्या कठीण परिस्थिती असताना देखील कामगार मंत्री गायबच आहेत. त्यामुळे कामगार मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना आम्ही जाहीर केली आहे. त्यामुळे कामगार मंत्री दाखवलेल्या व्यक्तीला आता बक्षीस देणार असल्याचे स्पष्ट मत कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. एन आर लातूर यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाल्याने अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दररोज काम करून आपल्या पोटाची खळगी भरून घेणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगार खात्याने आणि कामगार मंत्र्यांनी कामगारांना महिना पाच हजार रुपये देऊन सहकार्य करावे ही मागणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत कामगार मंत्री कोण आहे हेच समजले नाही. त्यामुळे कामगार मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. लातूर यांनी आवाहन केले आहे
मागील अनेक दिवसापासून कामगारांना त्रास होत आहे. मात्र याचे सोयरसुतक कामगार मंत्र्यांना नाही. आतापर्यंत कामगार मंत्र्यांनी एकदाही आपले दर्शन दिले नाहीत. कोणत्याही कामगारांची त्यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे बाहेर पडून त्यांनी कामाला लागण्याची गरज निर्माण झाली असताना झोपा काढण्याचे सोंग घेत असल्याचेही लातूर यांनी म्हटले आहे.
निवडणूक होऊन देखील कामगार मंत्र्यांनी कामगारांसाठी कोणती अशी मोठी घोषणा केली नाही अथवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले नाही. अनेक कामगारांना कामगार मंत्री कोण आहे हेच समजत नाही. त्यामुळे कामगारांच्या समस्या कोणाकडे मांडाव्यात असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक कामगार अडचणीत आले आहेत त्यांना सहाय्य करण्याचे सोडून कामगार मंत्री गायबच आहेत. त्यामुळेच कामगार मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी योजना मी जाहीर केली आहे, असेही ही ऍड लातूर यांनी सांगितले.