भारतात येणाऱ्या चिनी बनावटीच्या वस्तूवर बंदी घाला अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतात अनेक उद्योगात चिनी वस्तुंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.त्यामुळे चिनी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आम्ही एक प्रकारे हातभार लावत आहोत.अवजड उद्योगात लागणारी यंत्रसामुग्री,इलेक्ट्रॉनिक उद्योगात लागणारे सुटे भाग,खेळणी,विद्युत उपकरणात लागणाऱ्या वस्तू,रेशीम आदी अनेक वस्तू चिनहून भारतात आयात केल्या जातात.आकाशकंदील,बलच्या माळा आदी सणाच्यावेळी लागणाऱ्या वस्तूही चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठेत विकून परकीय चलन मिळवते.
यासाठी देशातील उद्योजकांना सवलतीच्या दरात अर्थ पुरवठा करून त्यांच्याकडून वस्तूंची निर्मिती भारतात करून घ्यावी.98 टक्के रेशीम चिनहून येते तर भारतात केवळ दोन टक्के रेशीम तयार होते.रेशीम निर्मितीला देखील देशात प्रोत्साहन दिले पाहिजे.चीन जगभरात उत्पादने विकून बलिष्ठ होत आहे.यासाठी चिनी वस्तूंची आयात थांबवून देशातच विविध वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजीत मूळगुंद यांनी वरील मागणी केली आहे.