अबकारी खात्याने लॉक डाऊन कालावधीत गावठी मद्य निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी उपाय योजना केली आहे.23 मार्चपासून आजपर्यंत अबकारी खात्याने 530 धाडी घातल्या आहेत.एकूण 63 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.या प्रकरणी 34 जणांना अटक केली आहे.
गोवा ,महाराष्ट्र बनावटीची दारू बरोबरच बिअर,शिंदी,कुजलेला गूळ, संत्री दारू,काजू फेणी,गावठी दारू अशी हजारो लिटर दारू जप्त केली आहे.45 दुचाकी,2 रिक्षा,1 कार,3 गुडस वाहने अशी एकूण 21 लाख किमतीची 51 वाहने जप्त केली आहेत.
जप्त केलेल्या मद्याची किंमत पन्नास लाख इतकी आहे असे अबकारी उपयुक्तांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.