Friday, December 20, 2024

/

बेळगाव जिल्हा पोजिटिव्ह रुग्णांत आता राज्यात तिसरा

 belgaum

एकेकाळी राज्यात सुरुवातीला झिरो कोरोना पोजिटिव्ह असलेला बेळगाव जिल्हा लॉक डाऊनच्या 21 व्या  दिवशी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहेत राज्यात सर्वाधिक बंगळुरू शहरात 80 मैसूरू 48 तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेळगाव मध्ये 18 पोजिटिव्ह आहेत राज्यात 258 पोजिटिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या कोरोना तपासणी अहवालांपैकी 471 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोना बाधितांची संख्या वाढून 18 झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात मंगळवार दि. 14 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1,785 इतक्या लोकांचे वैद्यकीय निरीक्षण झाले. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 484 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून 95 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 14 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 1,785 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 276 झाली असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 20 आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 664 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 825 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 484 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 18 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 371 नमुने निगेटिव्ह असून उर्वरित 95 नमुन्यांचा अहवाल हाती येणे बाकी आहे.

दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.