गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ आणि योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्गखोल्या करून देण्यात आल्या आहेत. त्यांचा अभ्यास योग्य पद्धतीने होतो की नाही यासाठी तालुका पंचायत मार्फत विविध ग्रामपंचायतींना भेटी देण्याचे काम सुरू होते. आता जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनीही याबाबत गांभीर्याने घेतले असून नुकतीच बिजगरणी येथे विद्यार्थ्यांना भेटी देऊन त्यांची विचारपूस करून त्यांना अभ्यासाबाबत टीप्स दिल्या आहेत.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांची कशापद्धतीने सोय केली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य सोयी-सुविधा मिळत आहेत की नाही याची विचारपूस करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी के वी राजेंद्र यांनी विद्यार्थ्यांना कमी वेळेत अधिक अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि परीक्षेत नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात याबाबत माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. याचबरोबर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनाही विद्यार्थ्यांना कोणतीच कमी पडू नये याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना पाण्याची सोय तसेच विद्युतची सोय आहे की नाही याची माहिती करून घेतली. त्यांनी दिलेल्या टिप्स विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने आचरणात आणू असे आश्वासन दिले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर इतर परिसरातील त्यांनी भेटी दिल्या बिजगरणी येथील दहावीच्या विद्यार्थ्यां ना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यावेळी तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलाडगी होते.