लॉक डाऊनच्या कालावधीत शहर आणि परिसरातील अनेक खाजगी इस्पितळाच्या ओपीडी बंद आहेत .त्यामुळे किरकोळ आजारासाठी देखील उपचार मिळणे अवघड झाले आहे.यासाठी खासगी इस्पितळातील ओपीडी सुरू करण्याचा आदेश द्या अशी मागणी जि. प.आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी जि प सीईओ डॉ के व्ही राजेंद्र यांची भेट घेऊन केली आहे.
खाजगी इस्पितळातील ओपिडी सुरू करा असा आदेश यापूर्वी बजावला आहे. ओपीडी लॉक डाऊन काळात बंद असतील तर आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी डॉ के व्ही राजेंद्र यांनी दिले आहेत.
बंगलोर आय एम ए ने देखील ओपोडी सुरू ठेवा अशी नोटीस काढलेली आहे.खासगी डॉक्टरांना देखील सरकारतर्फे सेफ्टी किट देण्यात येणार आहेत.सेफ्टी किटचा तुटवडा असल्याने सरकारने डॉक्टरांना सेफ्टी किटचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे खासगी डॉक्टरांनी सेफ्टी किटचा वापर करून रुग्णावर उपचार करावेत असेही डॉ के व्ही राजेंद्र यांनी सांगितले.तरीही डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले नाहीत तर आम्हाला कळवावे म्हणजे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असेही राजेंद्र यांनी रमेश गोरल यांना आश्वासन दिले.
रमेश गोरल यांनी जिल्हा आरोग्यधिकारी मुन्याळ यांचीही भेट घेऊन चर्चा केली. सर्व खाजगी इस्पितळातील ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करा अशा सूचना केल्या आहेत. जर कुणी प्राथमिक उपचार करण्यास नकार देत असतील आणि ओपीडी बंद असतील अश्यावर कारवाई करू असेही मुन्याळ यांनी गोरल यांना सांगितले.
लॉक डाऊन काळात जनतेला काही समस्या असल्यास आपणास संपर्क करावा असे आवाहन रमेश गोरल यांनी बेळगाव live च्या माध्यमातून केलं आहे रमेश गोरल 09880608211