मानसिक अस्वस्थ युवकाने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी
सकाळी उघडकीस आली. चेतन उर्फ सोमनाथ गुरुपाद हंजानट्टी (वय 30, रा. विद्यानगर तिसरा क्रॉस, अनगोळ) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार की चेतन हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक अस्वस्थ होता. बुधवारी रात्री जेवण करून तो त्याच्या बेडरूममध्ये गेला. आज सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता त्याने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिले असता चेतनने हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर टिळकवाडी पोलिस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. टिळकवाडी पोलिसांनी घटनेची नोंद झाली आहे.