Wednesday, November 20, 2024

/

विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

 belgaum

होळी निमित्त रंग खेळून विहिरीत आंघोळ करण्यासाठी जातो असे घरी सांगून तरुण विहिरीकडे गेला होता. मात्र पायघसरुन तो विहिरी कोसळला. पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हलगा–बस्तवाड येथे मंगळवारीदुपारी ही घटना घडली आहे.बाहुबली गोपाळ मलशेट्टी (वय 28, रा. हलगा,बस्तवाड) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारबाहुबली हा गवंडी काम करत होता. एक वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला आहे. मंगळवारी रंगोत्सव असल्यामुळे तो रंगखेळला. रंग खेळून झाल्यानंतर घरी आला. त्यानंतर त्याने पत्नीला मी विहिरीकडे आंघोळ करण्यासाठी जातोअसे सांगितले.

विहिरीकडे गेला असताना अचानक पाय घसरुन तो खाली पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. काही जणांनीतातडीने त्याला विहिरीकडे धाव घेतली. मात्र तो बुडालाहोता. या घटनेची माहिती अग्निशमक दलाला देण्यातआली.

घटनास्थळी जाऊन जवानांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची नोंद बागेवाडी पोलीस स्थानकातझाली आहे. बाहुबली याच्या पश्चात पत्नी, आई असा परिवार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.