अस्वलाच्या हल्ल्यात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.खानापूर तालुक्यातील आमटे गावाजवळील जंगलात ही घटना घडली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव रवी नायक(२८) असे आहे.जनावरांना चरण्यासाठी म्हणून जंगलात घेऊन गेलेल्या रवीवर अस्वलाने हल्ला केला आणि त्यात तो मृत झाला.
घटनास्थळी वन विभाग आणि पोलिसांनी धाव घेतली आहे.मृताच्या कुटुंबियांना घटनास्थळी मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी दूरध्वनीवरून मयतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे.