Sunday, January 26, 2025

/

टिळकवाडी भाजी मार्केट येथील ‘त्या’49 दुकानगाळयांचा होणार लवकरच लिलाव?

 belgaum

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटनजीक बेळगाव महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या आणि तब्बल 9 वर्षे धूळ खात पडून असलेल्या दुकानगाळ्यांचा लिलाव करण्याची योजना आखली जात आहे.

गेल्या 2012 13 साली पहिला रेल्वे गेटनजिक साई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने दुकान गाळे बांधले आहेत. या ठिकाणच्या 49 दुकान गाळ्यांपैकी 35 दुकान गाळे यापूर्वीच संबंधित लाभार्थींना हस्तांतरित करण्यात आले असले तरी त्यांना हस्तांतराची अधिकृत कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. परिणामी संबंधित गाळेधारक अद्यापपर्यंत आपापले दुकान गाळे ताब्यात घेऊन आपला व्यवसाय सुरु करु शकलेले नाहीत.

टिळकवाडीतील काँग्रेस रोडचे 1993 साली रस्ता रुंदीकरण करण्यात आले. तत्कालीन महापौर दिवंगत संभाजी पाटील यांच्या आदेशावरून धडाडीचे मनपा आयुक्त दिवंगत बारी नवाब यांनी प्रखर विरोधाला तोंड देऊन काँग्रेस रोडचे रस्ता रुंदीकरण केले. त्यावेळी ज्यांची दुकाने रस्ता रुंदीकरणात गेली त्या दुकानदारांना कलामंदिर शेजारील जागेत तसेच मनपाने बांधलेल्या दुकान गाळ्यांमध्ये प्राधान्याने जागा देण्यात आली. तथापि आजतागायत महापालिकेने संबंधित दुकानगाळे लाभार्थींच्या नांवावर रजिस्टर केलेलेच नाहीत. यात भर म्हणून आता काल बुधवारी या दुकानदार आणि भाजीविक्रेत्यांची कलामंदिर शेजारील जागेत असलेली दुकाने महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आली.

 belgaum
Tilakwadi mrkt
Tilakwadi mrkt

गेल्या सुमारे 27 वर्षापासून टिळकवाडी भाजी मार्केट परिसरातील भाजी विक्रेते आणि दुकानदार आपल्या अस्तित्वाचा लढा देत आहेत. महापालिकेकडून मात्र सातत्याने त्यांच्यावर अन्याय केला जात आहे कला मंदिर येथील महत्त्वाकांक्षी मॉलच्या प्रकल्पासाठी आता टिळकवाडी भाजी मार्केट भुईसपाट करण्यात आल्यामुळे येथील दुकानदार व भाजीविक्रेते पुन्हा रस्त्यावर आले आहेत. महापालिकेने बांधलेल्या दुकान गाळ्यांमध्ये या सर्वांना प्राधान्याने दुकानांचे गाळे दिले गेले पाहिजेत. तथापि महापालिकेने या बिचार्‍यांना काँग्रेस रोड रस्ता रुंदीकरणनंतर त्यांच्या नावावर झालेल्या दुकानगाळ्यांची अधिकृत कागदपत्रे दिली नसल्यामुळे लवकरच होणार्‍या दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये संबंधित दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना पदरमोड करून भाग घ्यावा लागणार आहे.

दरम्यान साई मंदिर रोड वरील 48 दुकान गाड्यांच्या लीलावा संदर्भात गेल्या मंगळवारी खास बैठक झाली. या बैठकीस आमदार अभय पाटील, मनपा आयुक्त के. एच. जगदीश, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरिअर व प्रांताधिकारी प्रकाश तेली उपस्थित होते. पहिल्या रेल्वे गेट नजीकचे महापालिकेचे हे दुकान गाळे कलामंदिरच्या जागेतील व्यावसायिकांना देण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. तथापि त्या गाळ्यांचा लिलाव करूनच त्यांचे वितरण केले जावे असा शासनाचा आदेश असल्यामुळे लिलाव केला तर कलामंदिर परिसरातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांचे टपुनर्वसन कसे व कोठे होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी लिलाव प्रक्रियेस आक्षेप घेतल्यामुळे तूर्तास सदर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.