बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणारे नागरिक अचानक वाढविण्यात आलेल्या मालमत्ता कराला विरोध करीत आहे. आयुक्त बर्चस्व यांनी घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या सुधारित करवाढीला 500 हरकती दाखल झाल्या आहेत.
कॅन्टोन्मेंट रेसिडेंट वेल्फेयर असोशियशन ने याबद्दल दोनवेळा निवेदन देऊन आपला विरोध मांडला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आजवरच्या इतिहासात कोणीही आयुक्तांनी असा नागरिकांना त्रास देणारा निर्णय घेतला नव्हता पण बर्चस्व यांनी असा निर्णय घेऊन या इतिहासालाच छेद दिला असल्याचे नागरिक संघटनांना वाटते.
यासंदर्भात सीईओ यांनी आपली भूमिका मांडतांना आपण सिएजी च्या नियमावली नुसार काम करत असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांसमोरही त्यांनी हीच भूमिका मांडली आहे.