भंडाऱ्याची गुलालाची उधळण न करता पर्यावरण पूरक अशी उत्तर कर्नाटकातील एक मोठी अशी सुळेभावी येथील महालक्ष्मी यात्रा आयोजन केली आहे. दर पाच वर्षाप्रमाणे यंदा सुळेभावी येथील श्री ग्रामदेवी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटी, ग्राम पंचायत सुळेभावी आणि सुळेभावी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवार दि. 10 ते बुधवार दि. 18 मार्च 2020 या कालावधीत ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा कमिटीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवनात यात्रा कमिटी व ट्रष्टीयांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.देवण्णा बंगेण्णावर व बसणगौडा हुंशीपाटील यांनी सदर माहिती दिली.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या सुळेभावी च्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज सोमवारी श्री ग्राम देवी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. बैठकीत यात्रेच्या आयोजनाबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली.
येत्या मंगळवार दि. 10 ते बुधवार दि. 18 मार्च 2020 या कालावधीत होणाऱ्या सुळेभावीच्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील श्री. बडगेर यांच्या घरात श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाणार असून सायंकाळी पाच वाजता देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. दुसऱ्यादिवशी दि. 11 मार्चला देवीला गावातून होन्नाट करत सवाद्य सायंकाळी जत्रेच्या मैदानावरील मंडपात नेऊन स्थानापन्न केले जाईल. यात्रेच्या चौथ्या दिवशी दि. 13 रोजी देवीला कानिके आणि आणि ओटी भरणे कार्यक्रम होईल तसेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी दि. 18 मार्च रोजी देवीला होन्नाट करत सायंकाळी गावाच्या सीमेवर नेण्यात येईल आणि त्याठिकाणी यात्रोत्सवाची सांगता होईल. श्री महालक्ष्मी मी यात्रोत्सव दरम्यान मैदानी खेळांसह शाहिर गान भजन सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.