Thursday, January 2, 2025

/

तणाव एक सार्वत्रिक समस्या- हेल्थ टिप्स डॉ सोनाली सरनोबत

 belgaum

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तणावाचा अनुभव कधी ना कधी घेतलाच असेल. आपल्यावरील तणाव आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतोच त्याशिवाय समाजातील बर्‍याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस ही समाजाला भेडसवणारी एक प्रमुख समस्या बनली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तणावाचा अनुभव कधी ना कधी घेतलाच असेल. आपल्यावरील तणाव आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतोच त्याशिवाय समाजातील बर्‍याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारीही व्याधी आहे.
तणाव म्हणजे काय?
कोणताही प्रसंग अथवा होणार्‍या बदलाला आपण दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक बदलाला आपण दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे तणाव. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठाच असला पाहिजे, असे नाी तर आपल्याला क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये ताण निर्माण करु शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीच बस चुकणे, ऑफिसला उशीर होणे, होमवर्क न होणे, शाळेत ओरडून घेणे इ.
कारणे :
1) बाह्य : कामाच्या ठिकाणचे अथवा घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.

2) आंतरिक : एकूण तणाव निर्मितीमध्ये 90-95 टक्के वाटा आंतरिक घटकांचा असतो. आधुनिक जीवनप्रणालीमध्ये जास्त तणाव निर्माण होतो. परंतु कोणतीही परिस्थिती ही स्वत: तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरुप त्या परिस्थितीकडे पहाण्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर सर्व अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे नेहमीच परिस्थितीदेखील कशी तणाव निर्माण करु शकते. पाहुया काही केसीस केस वेगवेगळ्या रुग्णामध्ये निराळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो.
1) आत्मविश्वासाचा अभाव : आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ताण येतो.
2) हळवेपणा : ओळखीचा मित्र बघून हसला नाही म्हणून ताण
3) लाजणे : आपरिचित व्यक्ती, ठिकाण येथे ताण
4) न्यूनगंड : आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यात ताण इ.
लक्षणे –
शारीरिक पित्ताचा विकार भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत/मूत्रपिंडाचे विकार इ.
2) मानसिक : लगेच दणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तिमत्व, निरुत्साह, उदासिनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता इ.
तणावनियोजन व उपचार : आपल्या मनात काही विशिष्ठ केंद्र असतात. त्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता आले पाहिजे.
वासना केंद्र : इच्छा निर्माण करते
आवडनावड केंद्र : आपल्याला चॉईस देते.
स्वभाव केंद्र : आपले वागणं रेखित करते.
देवाणघेवाण (हिशोब केंद्र) आपली प्रतिक्रिया निश्चित करते.
वैशिष्ठ्य केंद्र आपल्याला व्यक्तीवैशिष्ट्य देते पूर्ण नियंत्रण मिळवल्यास आपण परमयोगी बनू ते स्वत:वर अवलंबून असले तरी सर्वसामान्याला साध्य नाही. त्यासाठी अध्यात्म व योगाभ्यास लागतो.
आपणाला खूप ताण येत असल्यास नामजप, प्राणायाम यांचा खूप उपयोग होतो. शिवाय आम्ही अशा व्यक्तींसाठी सवय न होणारी पुष्पौषधी रेडीमिक्स उपलब्ध करुन दिली आहेत. बॅचफ्लाॅवर मीक्स 19 आणि 27 या विकारावर उपयुक्त आहेत. ही औषध
www.thebachflower.comयावर ही घरपोच मिळू शकतात. किंवा 1 एमजी या साईटवर सुद्धा उपलब्ध आहेत.
पुष्पौषधी व होमिओपॅथी ही द्वयी तणावावर उत्कृष्ट उपाययोजना मानली जाते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.