कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे.चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत.उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर बऱ्या पैकी बंदी आणली आहे.अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.मनपाच्या आरोग्य विभागाने आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथके तयार केली असून ही पथके शहरातील विविध भागात फिरून जनतेची अधिक वर्दळ असलेली आस्थापने बंद करायला लावत आहेत.
अन्यही जनतेची अधिक वर्दळ असलेली आस्थापने बंद करण्यात येत आहेत.मॉल आणि अन्य मोठी दुकाने बंद करायला लावून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याचे फोटो काढून घेत आहेत.हे फोटो ते आपल्या वरिष्ठांना पाठवत आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचा आदेश दिलेला असतानाही शहरातील काही मॉल अद्यापही सुरूच ठेवण्यात येत असल्यामुळे आता बेळगाव महापालिकेकडून संबंधित शॉपिंग मॉल्सना टाळे ठोकले जाणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी रविवार 15 मार्चपासून शहरातील सर्व शॉपिंग मॉल्स व चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तथापि शहरातील रिलायन्स, फ्रेश, बिग बझार, डीमार्ट आदींपैकी काही शॉपिंग मॉल्स अद्यापही सुरू ठेवण्यात येत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेचे एक खास पथक शहरात फिरून संबंधित शॉपिंग मॉल्सना टाळे ठोकणार आहे.