शहापुर नाथ पै सर्कल येथून खासबाग सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकावरील एक जीर्ण झाड मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उन्मळून पडले. त्यामुळे रस्त्यावरील अन्य धोकादायक झाडे तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
शहरात आज सायंकाळी साडेचार पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे शहापुर नाथ पै सर्कल येथून खासबाग सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकावरील एक जीर्ण झाड उन्मळून पडले. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर यावेळी रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सदर मार्गावरील अनेक झाडे जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. तेंव्हा महापालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित धोकादायक झाडे हटवावीत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान, वाहतूक आणि गुन्हा विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांनी सायंकाळी शहापूर नाथ पै सर्कल परिसराला भेट देऊन तेथील कोसळलेल्या झाडासह दुभाजकावरील अन्य धोकादायक झाडांची पाहणी केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी कोसळलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
नाथ पै चौकात कोसळलं झाडं
वळीवाचा दणका-नाथ पै चौकातील शहापुर पोस्ट ऑफिस समोरील झाड विद्युत तारांवर झाड कोसळलं मात्र सुदैवाने घराला आणि इतरांना कोणतीच हानी झाली नाही.सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण यांच्या घरा समोरुन तारा गेल्या होत्या..
#rainfall24march2020
#treefallen
#नाथपैचौक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1067470940277165&id=375504746140458