लोक डाऊनमुळे बेळगाव – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुतकट्टी घाटातील मारुती ढाबा येथे अडकून पडलेल्या झाबुआ (म. प्र.) येथील आदिवासी परिवारातील मजुरांना बेळगावच्या रहमान फाऊंडेशनतर्फे शनिवारी महिनाभराचे जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
झाबुआ (मध्यप्रदेश) येथील आदिवासी समाजाचे बहुसंख्य लोक रस्ते कामासाठी मजूर म्हणून उत्तर कर्नाटकात आले आहेत. सध्या देशव्यापी लॉक डाऊनमुळे आपल्या मुळगावी परतण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे यापैकी सुमारे 17 – 18 मजूर गेल्या कांही दिवसांपासून सुतकट्टी घाटातील मारुती ढाबा येथे अडकून पडले आहेत. याबाबतची माहिती मिळताच रहमान फाउंडेशन बेळगावच्या पथकाने शनिवारी मारुती ढाबा येथे तात्काळ धाव घेऊन त्या मजुरांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य व किराणामालाचे साहित्य मोफत देऊ केले.
मध्यप्रदेशातील आदिवासी समाजातील संबंधित गरीब मजुरांना अल्पावधीत मदत पुरवल्याबद्दल राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी वामन मेश्राम आणि सज्जाद नोमानी साहब यांनी रहमान फाउंडेशन बेळगावचे अभिनंदन करून प्रशंसा केली आहे.