राणी चन्नमा युनिव्हर्सिटीला जागा मंजूर करावी असे निवेदन पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.2009-2010 या शैक्षणिक वर्षात ही युनिव्हर्सिटी सुरू झाली असून अद्याप याचे कार्य पूर्वीच्या धारवाड युनिव्हर्सिटीच्या पदव्युत्तर केंद्रातच चालत आहे.
अद्याप सगळे कोर्स येथे सुरू करण्यात आलेले नाहीत.वर्ग खोल्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.वसतिगृहात नेहमी पाण्याची समस्या असते.
विद्यार्थिनी साठी स्वच्छतागृहे नाहीत.बेळगाव,विजापूर आणि बागळकोट जिल्ह्यासाठी ही युनिव्हर्सिटी असून अद्याप तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे लवकरात लवकर जागा मंजूर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्या कडे केली आहे.