Friday, January 24, 2025

/

मुखबधिर मतिमंद मुलीवर बलात्कार

 belgaum

मुरगोड (ता. सौंदत्ती) पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात 15 वषीय मुकबधीर व मतीमंद मुलीवरबलात्कार करण्यात आला आहे. सध्या ती मुलगी सहा महिन्यांची गर्भवती झाली आहे.

यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारीत्या पिडीत मतीमंद मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असूनतीच्या या अवस्थेला जबाबदार कोण? याची चौकशी करण्यात येत आहे.

ती मुकबधीर आहे. मतीमंदही आहे. त्यामुळे आपल्या सोबत काय झाले आहे? याची कल्पनाही तिला नाही.कोणामुळे आपल्यावर वेळ ओढवली आहे? हे सांगण्याइतपतही ती मानसिकरित्या स्थीर नाही. पोटदुखीचात्रास जाणवल्यामुळे तिला कुटुंबियांनी तिला दवाखान्याला नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनीसांगितले.

सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी तिला दाखल करण्यात आले आहे. मुकबधीर वमतीमंद मुलीवर बलात्कार करणारा नराधम कोण, याचा शोध घेण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.