बेळगाव लोंढा मार्गावरील खानापूर नजीक शेडगाली गावाजवळ मालवाहू रेल्वेच्या धडकेत दोन दोन गवी रेडे ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे.
खानापूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेडेगाळी गावाजवळ गवी रेड्यांचे मोठे कळप आहेत. या ठिकाणी वारंवार रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेच्या धडकेत वारंवार जंगली प्राण्यांना प्राण गमवावा लागत आहे. मंगळवारी पहाटे च्या सुमारास मालवाहू रेल्वेच्या धडकेत दोन गवीरेडे जागीच ठार झाले आहेत.
यामध्ये एक गवी रेडा नऊ वर्षाचा तर एक–दीड वर्षाचा असून दोन्ही मादी जातीचे आहेत. सदर माहिती मिळताच खानापूर ते वन संरक्षण अधिकारी शशिधर तसेच विभागीय वनाधिकारी बसवराज वाळद तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पशु वैद्य अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा केला. खानापूर लोंडा मार्ग जंगलाच्या सान्निध्यातून जातो.
या भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे रेल्वे ट्रॅक ओलांडताना अनेक वेळा अपघाताच्या घटना घडून गेल्या वर्षभरात अनेक प्राण्यांना आपला जीव गमावला आहे यामध्ये प्रामुख्याने गविरेड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरातील चौथी घटना म्हणावी लागेल.