रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आज सरकारी विश्रामगृहात उद्योजकांची बैठक घेऊन चर्चा केली.महिना संपत आल्यामुळे कामगारांना पगार देण्याची व्यवस्था करण्यासंबंधी उद्योजकांशी संवाद साधला.पुढील एक आठवड्यात कामगारांना पगार देण्यासंबंधी अंगडी यांनी विचारविनिमय केला.कामगारांना पास देऊन पगार वितरण करण्याची व्यवस्था करा.कठीण काळात पगार वेळेत देणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.
लॉक डाऊन सगळ्यांनी गांभीर्याने पाळणे आवश्यक आहे.प्रत्येकाने घरातच बसून राहणे गरजेचे आहे.आपण जितक्या गांभीर्याने लॉक डाऊन पाळू तितक्या लवकर कोरोनाचा नायनाट होणार आहे.जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा नाही.
गुडस रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे.रेल्वेच्या जुन्या डब्याचा वापर रुग्णांना ठेवण्यासाठी भविष्यात करण्यासाठी त्या संबंधी तयारी सगळ्या रेल्वे डिव्हिजन मध्ये केली जात आहे.डॉक्टर,आरोग्य खात्याचे कर्मचारी,पोलीस खाते आणि प्रसार माध्यमे यांचे अंगडी यांनी अभिनंदन केले.
रेल्वेचे ए सी कोच हॉस्पिटलमध्ये रूपांतर करा अशी मागणी सोशल मीडियावर रंगली होती अनेकांनी याबाबत पी एम ओ यांना ट्विट देखील केली होती याची दखल सरकारने घेतली आहे.