संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना नमाज पढण्यासाठी मशिदीत अनेक लोक जमून लॉक डाऊनच्या नियमांना हरताळ फासल्याने पोलिसांनी त्यांना मशिदीतून बाहेर काढून चांगलाच चोप दिला.
गोकाक गावात ही घटना घडली आहे.मशिदीत लोक मोठ्या संख्येने नमाज पढण्यासाठी जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
![Lathi covid](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/03/FB_IMG_1585223613002.jpg)
पोलिसांनी लगेच तेथे धाव घेऊन मशिदीतून लोकांना बाहेर काढून चांगला चोप दिला.दोन मशिदीत नमाज पढण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते.लोक जमले की कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेर काढून चोप देऊन त्यांची पळता भुई थोडी केली.