नवीन लग्न करून घरात आलेल्या सुनेला भाकरी बनवायला येईल की नाही? असा प्रश्न आजच्या काळात निर्माण झाला आहे. रोजचा स्वयंपाक करण्याचे शिक्षण सासूबाईंना द्यावं लागतं आणि शिकून ही नवी सून जेवण करू शकेल की नाही असा प्रश्न निर्माण होतो .
मात्र आजच्या फास्टफूडच्या जमान्यात सगळ्यांच्या तोंडात शब्द बसलाय तो पिझ्झा .
याचबरोबरीने आणखी अनेक फास्टफूडचे प्रकार आहेत. ते सर्व पदार्थ बनवण्यात तरबेज होऊन बेळगावच्या एका भगिनींने आपलं नाव मोठे केले आहे.
![Pizza rajeshree](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/03/FB_IMG_1583587324380.jpg)
सन्मान हॉटेल जवळ असलेल्या अमेरिकन पिझ्झाच्या सेंटरमध्ये त्या काम करतात. वय वर्ष बत्तीस असलेल्या राजश्री कल्लान्नावर गेली दहा वर्ष येथे नोकरी करून चांगला पगार कमावतात आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावतात यातून घरखर्च भागवतात.
त्यांचे पती हॉटेल लाईन मध्ये कामाला आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये, त्यांचे शिक्षण सुरू आहे. फुलबाग गल्लीमध्ये एका भाड्याच्या घरात हे कुटुंब राहते .लग्न झाल्यानंतर काही तरी काम करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि राजश्री यांनी हॉटेल लाईन मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आता त्या फास्टफुड प्रॉडक्शन चया कामात तरबेज झालेल्या आहेत आणि त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे .
घरात बसून पतीच्या मागे भुण भुण लावण्यापेक्षा स्वतः काहीतरी काम करून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे.