पेट्रोल भरण्याचे काम ही पुरुषांची मक्तेदारी अशा ठिकाणी महिला काम करत नाहीत असंही बोललं जात होतं. पण पेट्रोल पंपावर अनेक महिला काम करताना दिसतात फक्त तरुणी किंवा युवतीचे नव्हे तर विवाहित महिलाही पेट्रोल विक्री करण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात.
त्यापैकी आपल्याला भेटल्या आहेत एक महिला. त्यांचे नाव आहे कल्पना विजय खांडेकर. चवाट गल्ली येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण दहावी आहे. मागील आठ वर्षांपासून काम करत महिन्याला बारा हजार पर्यंत पगार त्या मिळवतात.
महागाईमुळे कुटुंब चालवणं कठीण बनले असताना, आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कल्पना येणे या व्यवसायात पाय रोवले. आपल्या कुटुंबाला चालना देण्यासाठी म्हणून हे काम त्यांनी सुरू केलं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पुरुषांनीही त्यांना साथ दिली आणि आज पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या जातात. कारण एक धाडसी काम करणारी एक महिला म्हणून त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे.
समाजामध्ये काही कामे महिलांनी करायची काही कामे महिलांनी करू नयेत असे काही लिहून ठेवलेले नसते. आपण धाडस दाखवले तर आजूबाजूचे पुरुष आपल्याला साथ देतात आणि आपले कुटुंब सावरायला मदत केली जाते. असे त्या सांगतात कामाला सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की आपण हे काम करू शकेन की नाही मात्र आपण हे काम अतिशय उत्साहाने करतो. कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही, उलट दिवसभर काम करून घरी गेल्यानंतर एक समाधान मिळते, या कामातून आज कुटुंबाला मदत झाली आहे .
मुलांचे शिक्षण सुरू आहे. महागाईमुळे घर चालवणे कठीण होते .यावेळी महिलांनी काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा असे त्यांनी सांगितले.